spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वर्षाच्या सुरवातीलाच शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, जाणून घेतल्या समस्या

काल २०२२ वर्ष संपला आणि २०२३ वर्षाला आजपासून सुरवात झाली. वर्षाच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) हे कामाला लागले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार यांनी पाहणी केली आणि संवाद साधलाा. यावेळी पवारांनी खासदाराबाबत गुगली टाकली आणि एकच हश्शा पिकली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इंदापूर तालुक्याच्या (Indapur Taluka) दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळस या गावांना पवार यांनी भेटी दिल्या. यावेळी द्राक्ष उत्पादक (Grape grower) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार पाहणी केली. यावेळी शरद पवारांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले. ‘मी एका ठिकाणी विचारले की खासदार येतात का? तर ते म्हणाले सारखे येतात. आधीचे खासदार कधी येतंच नव्हते तेव्हा मी सांगितले की पूर्वीचा खासदार मीच होतो’ असे म्हणताच एकच हशा पिकला. १५ वर्षांपूर्वी फळबाग लागवडीच्या संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली होती. आज भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन (Fruit production) करणारा देश असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. अनेक देशात गेलो की तेथील बाजरात जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारताचा शिक्का बघायला मिळतो असेही पवार म्हणाले. आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात (Grapes export) होत असल्याचे पवार म्हणाले. इंदापूर (Indapur) तालुक्यातील बोरी गावात शरद पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यात शरद पवारांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. यामध्ये कळस येथील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली. मधुकर खर्चे यांनी एका एकरात १०० टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. गेली अनेक वर्षे खर्चे हे १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांच्या ऊस शेतील भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याआधी एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेणारा आणि ५० कांड्याचा ऊस मी कधी बघितला नसल्याचे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

तोंडात सिगारेट, हातात कुऱ्हाड, वाढलेली दाढी रणबीर कपूरच्या ‘Animal’ चा फर्स्ट लूक पोस्टर झाला रिलीज

नववर्ष कसं असणार तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात? Yearly Horoscope 2023 – पंडित राजकुमार शर्मा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss