ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा, संजय राऊत

ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा, संजय राऊत

नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या न्यास भूखंडच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही याच प्रकरणावरुन शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही रंग सफेदी कराल? भूखंड घोटाळा अतिशय गंभीर आहे तरीसुद्धा तुम्ही नाक वर करुन बोलत आहात. मला एक कळत नाही फडणवीस भ्रष्टाचाराच्या पाठिशी कशाला उभं राहत आहेत? यात काय तुमची मांजर-बोक्यासारखी वाटणी झाली आहे का?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत हल्लाबोल केला.

हेही वाचा : 

Coronavirus in China चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ! व्हिडीओ होतोय व्हायरल

सीमावादावरुन संजय राऊत म्हणाले,

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra-Karnataka border) जनतेच्या भावना तीव्र असल्याचेही खा संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले. बोम्मई काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. सीमावादाच्या मुद्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) गप्प का? असा सवाल राऊतांनी उपस्थित कला आहे. सीमावादाचा मुद्दा असला तरी ऐकमेकांचा आदरभाव ठेऊन हा संघर्ष सुरु झाला होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक असल्याचे राऊत म्हणाले. सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर भूमिका घेणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाहीत असेही राऊत म्हणाले. तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलता, मग सीमाप्रश्नावर का बोलत नाहीत असेही राऊत म्हणाले.

India Coronavirus कोरोनाचा धोका वाढला, आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

सीमाप्रश्नानावर अमित शहांनी नेमकं काय केलं?

सीमावादावरुनही संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा. सीमावादावरुन शेजारील राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला बेअब्रू करत आहे तरी तुम्ही बोटचेपीची भूमिका घेत आहात. दिल्लीत अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक झाली म्हणजे नेमकं काय झालं? नेमकी कसली मध्यस्थी केली? त्या बैठकीनंतरही बोम्मई महाराष्ट्राला ब्रेअब्रू करत आहेत. त्यांचं तोंड बंद झालेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मोठी बातमी ! Elon Musk Twitter च्या CEO पदाचा देणार राजीनामा

Exit mobile version