Atul Benke यांची Sharad Pawar यांच्यासोबत भेट; पुण्यातील राजकीय भेटी ठरणार गेमचेंजर ?

Atul Benke यांची Sharad Pawar यांच्यासोबत भेट; पुण्यातील राजकीय भेटी ठरणार गेमचेंजर ?

सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडीना वेग आला आहे. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत.अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच आता पुण्यातील राजकारणात गेमचेंज होण्याचे नक्षत्र दिसत आहेत. आज अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके(Atul Benke) पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

या आधी जुलै महिन्यात अतुल बेनके यांनी शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली होती.खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली होती. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अतुल बेनके आणि शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट झाली. अमोल कोल्हेंच्या घरी झालेल्या भेटीनंर शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं होतं.

तानाजी सावंत यांच्या पुतण्याची शरद पवार यांची भेट :

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठीा दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याचं कळतंय. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत. विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत. इच्छूक उमेदवारांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटात येण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

Sanjay Raut यांच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून MAHAYUTI वर आरोपाच्या थेट फैऱ्या..

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version