Thursday, July 4, 2024

Latest Posts

Atul Bhatkhalkar यांनी सांगितले ३ मिनिटांच्या भेटीचे गमक

स्वागत केल्यानंतर एकीकडे चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

२७ जून २०२४ रोजी मुंबई येथे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरूझाले आहे. आजचा या १५ व्य विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हे अधिवेशन आजच्या दिवशीसाठी स्थगित करण्यात आले. यात आज शोकसभा घेण्यात आली. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे सांगण्यात आली. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या घडीला चर्चेचा विषय बनले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. आजचे हे पावसाळी अधिवेशन सुरू होताच वादळी बनल्याचे दिसले. यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रश्नांची चर्चा करण्यात आली होती. पहिलीच विषय होता इंदिरा गांधींच्यावेळी (Indira Gandhi) लागू झालेल्या आणीबाणीचा ज्यामुळे संपूर्ण सभागृहात गदारोळ मजला. त्यांनतर पहिल्याच दिवशी जोरदार हल्लाबोल करत विरोधक आक्रमक झाले.

विधीमंडळात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil )उद्धव ठाकरेंचे स्वागत  केलं. स्वागत केल्यानंतर एकीकडे चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. ही प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे. 

अतुल भातखळकर म्हणाले की – “विधानपरिषदेचे अधिवेशन सुरू झाले आहे आणि उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने एकमेकांसमोर आले. समोरसमोर आल्यानंतर ऐकमेकांशी बोलणे ही आपली संस्कृती आहे आणि हा आपल्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. २६ जून रोजी मतदान पूर्ण झाले.  मतदान होईपर्यंत आम्ही प्रचंड ताकदीने काम केले आहे. समोर अनिल परब भेटले असतील तर शुभेच्छा दिल्या असतील.  यात वेगळे काही घडले असे वाटत नाही. कोणताही राजकीय अर्थ करण्याची गरज नाही.”

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच लिफ्टन प्रवास केला यावर बोलताना भातखळकर म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यातून फडणवीस हे किती मोठ्या मनाचे आहे हे दिसून येते. फडणवीसांच्या जागी दुसरा कोणता नेता असता तर त्याने रिॲक्शन दिली असती. पण उद्धव ठाकरे हे किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. तरीसुद्धा  आपण आपली मर्यादा आणि सज्जनशीलता सोडायची नसते याचेच एक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले आहे. अटलजी कायम म्हणायचे की समोरचे विरोधक हे माझे शत्रू नाहीत विरोधक आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्याच विचारावर चालणारे नेते आहेत.”    

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा लिफ्टने झाला एकत्र  प्रवास :

आज विधिमंडळात एकाहून एक धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळाला. विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. या संवादातून दिग्गजांचा हजरजबाबीपणा समोर आला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील तोंडदेखला का होईना पण झालेला संवाद हा महत्त्वाचा मानला जात आहे. या वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. 

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

MAHARASHTRA ASSEMBLY MANSOON SESSION 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss