Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज तोडगा निघणार, Atul Save यांचे मोठे वक्तव्य

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज तोडगा निघणार, Atul Save यांचे मोठे वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे रात्री १२ वाजल्यापासून जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण (Manoj Jarange Hunger Strike) सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा, बॉंबे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी यावर मोठे भाष्य करत ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज तोडगा निघणार,’ असे वक्तव्य केले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज (मंगळवार, १७ सप्टेंबर) जालना शहरातील जुना जालना येथील टाऊन हॉल येथे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडली. याप्रसंगी मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्रीपासून आमरण उपोषणाला बसले असता या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, “आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजी नगर येथे येत आहे आणि यावेळी त्यांच्याशी बैठकी घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य ती चर्चा करत तोडगा काढणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

तसेच याप्रसंगी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना आदरांजली वाहत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व मराठवाड्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या लढाईत सहभागी असलेली स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारस तसेच शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर: CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version