spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना कोणाची? शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत डेडलाईन

नवी दिल्ली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेली शिवसेना आता नेमकी कुणाची ? असा सवाल गेल्या काही दिवसाची राजकीय परिस्थिती पाहता उपस्थित झाला आहे. शिवसेनेतून निर्माण झालेल्या एक स्वतंत्र शिंदे गटामुळे हा पेच निर्माण झाला आहे. शिवाय उच्च न्यायलाकडून हे प्रकार संवेदनशील असल्यामुळे तारीख पे तारीख दिली जात आहे. यामध्ये नेमका निर्णय काय होणार? हा प्रश्न केवळ राजकीय नेतेमंडळीना नाहीतर जनतेला देखील पडलेला आहे. याबाबत आता शिवसेनेने आणि शिंदे गटाने कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे पुरावे सदर करण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना कुणाची ह्या प्रश्नाचे उत्तर 8 ऑगस्टच्या सुनावणीनंतरच मिळणार आहे.
हेही वाचा : 

तुम्ही पण चहासोबत बिस्किटे खाता का? ही सवय खूप धोकादायक असू शकते.

या पक्ष स्थापनेसंर्भातील कागदपत्रे ही निवडणुक आयोगाकडे जमा केली जातात. शिवाय सध्या जो पेच निर्माण झाला आहे त्यासंदर्भात काय निर्णय होणार यासाठी आयोगाने कागदपत्रांचे पुरावे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुरावे सादर केले जाणार आहेत. आतापर्यंत पक्षावर शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावा केला जात होता पण आता निर्णय काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेकडून वारंवार शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राउत व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत आहेत. शिवसेना कुणाची हा मुद्दा सध्या न्यायालयात असला तरी केंद्रीय यंत्रणाबाबत नव्याने सांगण्याची गरज नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी या यंत्रणाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहे.

‘रंजना अन्फोल्ड’ अभिनेत्री रंजनाचा रंजक जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Posts

Don't Miss