Sunday, September 29, 2024

Latest Posts

देशातील राजकारण्यांची झोप उडवणाऱ्या सत्ता पालटावरचं ‘महासत्तांतर’ प्रकाशित

देशाच्या राजकारणात भूकंप घडवणारं महासत्तांतर जून महिन्यात राज्यात घडलं. या सत्तांतरानंतर ५६ वर्षाच्या शिवसेनेत न भूतो अशी उभी फूट पडली. पक्षाचे सर्वेसर्वा असलेले पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अवघ्या काही तासात खुर्चीवरून पायउतार होत घरी परतले. या महासत्तांतरातल्या पडद्यामागच्या अनेक गोष्टी आणि तपशील या प्रसार माध्यमांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या नजरेस पडू शकल्या नाहीत. अशा अनेक गोपनीय आणि धक्कादायक गोष्टी सत्तेच्या चक्रव्यूहात थेट घुसून वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न महासत्तांतर या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘इंकिंग इनोवेशन’च्या आनंद लिमये यांनी हे अत्यंत धाडसी पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलेलं आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रवृत्ती आणि प्रकृतीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जूनच्या मध्याला एक विलक्षण असा राजकीय भूकंप घडवला, की गल्ली ते दिल्ली असं देशाचं राजकीय क्षितिज हादरून गेलं. त्यातून अनेक प्रश्न राजकीय वर्तुळाभोवती उभे ठाकले. त्याची उत्तरं सगळ्यांना कुठं ठाऊक आहेत? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या हादरवून टाकणाऱ्या या सत्तांतरातल्या अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांच्या नजरेतून सुटल्या होत्या. छोट्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूज च्या कल्ल्यामध्ये निसटलेल्या गोष्टींचं हे धमाकेदार आणि रसरशीत पुस्तक नेते मंडळींच्या भुवया उंचावणारं आहे. डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या या पुस्तकातील अनेक तपशील जितके रोमांचक आहेत तितकेच स्फोटकदेखील आहेत.

Rishabh pant birthday : उर्वशीने ऋषभ पंतला दिल्या खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्या, पाहा व्हिडिओ

गेले काही दिवस दसरा मेळाव्यावरून राजकीय कल्ला सुरू असतानाच राजकीय पत्रकार राजेश कोचरेकर यांनी लिहिलेले आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संपादित केलेले ‘महासत्तांतर’ आनंद लिमये यांनी वाचकांच्या भेटीला आणले आहे. या पुस्तकांत अनेक राजकीय खुलासे झाल्याने काही नेत्यांची झोप उडाली नाही तरच नवल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निष्पक्ष आणि निर्भीडपणे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी अनेक राजकीय, सामाजिक आणि आशयघन पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिचित असलेल्या ‘इंकिंग इनोवेशन’च्या आनंद लिमये यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन राजकीय नेत्यांच्या हस्ते करण्याऐवजी विद्येची देवता असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या चरणी हे पुस्तक अर्पण करून वाचकांसाठी खुले केले आहे. हे पुस्तक राज्यातील सगळ्या प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्याचवेळी ते वाचकांना घरपोच मिळण्याची व्यवस्था आहे. २५० रुपयांचे पुस्तक दिवाळीपूर्वी वाचकांना दोनशे रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. या पुस्तकाला घरपोच मिळवण्यासाठी राज्यभरातले आणि देशभरातले वाचक मोबाईल क्रमांक 937 2807513 किंवा 022 24122756 क्रमांकावर संपर्क साधून तपशील मिळवू शकतात.

‘कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा… ‘, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Latest Posts

Don't Miss