संजय राऊतांना तुरुंगात भेटण्यापासून मंत्र्यांना अधिकारांनी अडवले

संजय राऊतांना तुरुंगात भेटण्यापासून मंत्र्यांना अधिकारांनी अडवले

मुंबई : शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना 22 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत न्यायालायाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राऊतांना घरचे जेवण आणि औषध देण्यात येत आहेत. परंतु कोणत्याच व्यक्तीला संजय राऊत यांना भेटू दिले जात नाहीये. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊतयांनाही तुरुंग अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिला आहे.

आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आर्थर रोड तुरुंगामध्ये गेले होते. त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे राऊत यांची भेट घेण्याची विनंती केली. मात्र, तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांनी खासदार आणि आमदारांना संजय राऊत यांची भेट नकार दिला. तुरुंग नियमावलीनुसार केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संजय राऊत कैदी नंबर 8959

संजय राऊत यांना ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 असा दिला आहे. या कारागृहात सध्या ते पुस्तकं वाचणं आणि बातम्या पाहण्यात आपला वेळ घालवतात. बातम्या बघत ते राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यानंतर वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे संजय राऊत स्वतःचे विचार वहीत लिहता असतात. राऊत हे आपल्या लिखाणात खंड पडू देत नाही. मात्र त्यांचे ते लिखाण हे त्यांच्यापर्यंत मर्यादित राहणार आहे. ते बाहेर छापण्यासाठी दिले जात नाही.

हेई वाचा : 

समीर वानखेडे जन्मतः मुस्लीम नाही, समितीचा निकाला

Exit mobile version