spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळ विस्तारासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष नक्की कोणाचा हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. म्हणजे शिवसेना हा पक्ष ठाकरे सरकारचा की शिंदे गटाचा.

मुंबई  –  सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष नक्की कोणाचा हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. म्हणजे शिवसेना हा पक्ष ठाकरे सरकारचा की शिंदे गटाचा. राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यात मंत्रीमंडळाचा विस्तार हा एक प्रश्न उभा आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते मंडळीकडून मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत.

रविवारपर्यंत विस्तार होईल, असे शिंदे  प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १५ ऑगस्टपूर्वी विस्तार होईल असा दावा केला होता. सर्वोच नायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीत निर्णय होण्याची अपेक्षा होती. परंतु न्यायालयाने सुनावणी पुन्हा सोमवारी ठेवली असून त्यावेळी अंतिम आदेश दिला जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही.

गेला महिनाभर रखडलेला मंत्री मंडळाचा विस्तार हा शुक्रवारी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात होती. शासकीय यंत्रणांनी तशी तयारीही केली होती. परंतु मंत्री मंडळाचा विस्तार हा शुक्रवारी होणार नाही अशी चिन्हे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण दिसवभाराचे संपूर्ण कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीत गेल्याने विस्ताराची चर्चा हि सुरु झाली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्यांनीही दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

 

हे ही वाचा :-

काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

Latest Posts

Don't Miss