Thursday, July 4, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil हे OBC नेत्यांवर खालच्या स्तराची भाषा वापरतात, तेवढी त्यांची उंची आहे का? : Babanrao Taywade

ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी जरांगे पाटील यांच्यावर पलटवार करत 'मनोज जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, तेवढी त्यांची उंची आहे का?' असा सवाल केला आहे.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद (Maratha OBC Reservation Dispute) आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांवर टीका केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अश्यातच आता ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी जरांगे पाटील यांच्यावर पलटवार करत ‘मनोज जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, तेवढी त्यांची उंची आहे का?’ असा सवाल केला आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले, “जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात,त्यांची उंची आहे का? ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात, येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते हवं आम्ही दाखवून देऊ. लक्ष्मण हाके यांचे अभिनंदन, पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आमची शक्ती दाखवू.”

ते पुढे म्हणाले, “उपोषणकर्ते आणि शिष्ट मंडळात जे ओबीसी नेते सहभागी झाले होते त्यांचे अभिनंदन. सर्व राजकीय नेते सहभागी झाले आणि ओबीसींचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी समाजाची मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये , इतरही प्रश्न चर्चेला गेले,सगेसोयरे मुळे ओबीसींचे नुकसान होणार नाही ओबीसीला न्याय मिळेल. महाज्योति ला लोकसंख्येनुसार जास्तीत जात निधी द्यायला पाहिजे,युवक आणि सामान्य माणसाचे भले होईल. ओबीसी हॉस्टेल सुरू झाले नाही याचीही चर्चा व्हायला पाहिजे, बिहार मध्ये जशी जनगणना झाली तशीच जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी बाध्य करावे.”

“कुणबी नोंदींबाबत ५४ लाख किंवा ५७ लाखांचा आकडा सांगत आहेत, यात ५७ लाखात ९५ टक्के नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलन आधीच्या आहेत. सरकारने श्वेत पत्र जाहीर करावे, की जरांगे यांच्या आंदोलनपूर्वी आणि आंदोलन नंतर किती नोंदी झाली,मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे. एसी,एसटी, ओबीसी इंदिरा सहानी जजमेंट आहे की ५० टक्के पेक्षा आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही मागणी करतो की १९९२ मध्ये कोर्टाने घालून दिलेली मर्यादा काढावी आणि लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा

Laxman Hake Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण मागे, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम

आमची लढाई सुरूच, संपलेली नाही, Chhagan Bhujbal यांचा नारा

Laxman Hake Hunger Strike:ओबीसींचा आवाज…’लक्ष्मण हाके’ आहेत तरी कोण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss