spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार ? Bacchu Kadu तिसरी आघाडी स्थापन करणार?

बंडापासून आता पर्यंत साथ देणारे आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) हे महायुतीची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. 

लोकसभेनंतर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वाचेचं लक्ष लागले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना अधिकाधिक वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून महायुतीला गळती लागल्याचं चित्र वारंवार दिसत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडापासून आता पर्यंत साथ देणारे आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) हे महायुतीची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

काल दिनांक ८ जुलै रोजी आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu), शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar), छत्रपती संभाजी राजे(Sambhajiraje )आणि काही आप चे नेते हे एका कार्यक्रमाला एकत्रित भेटले होते. शेतकरी, शेतमजूरी संदर्भात लढलं पाहिजे या संदर्भात त्यांची चर्चा झाली. मात्र त्यांच्या या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं.

राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असून शेतकऱ्यांचा विषय हा अधिक चर्चेत आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांबाबत,”शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ.आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे.पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणून येतात.आमचा १०-१५ आमदारांचा जर एखादा गट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक राहिला, तर त्यासंदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात.” असं वक्तव्य करत त्यांनी केलं.

त्यानंतर महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता,”नाखूश नाही.आम्ही मुद्द्यांवर चर्चा करुन लढू.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु. सकारात्मक निर्णय काय येत आहे ते बघू आणि जर सरकारकडून हे नाही झालं तर किमान मी तरी १०-१५ ठिकाणी उमेदवार उभे करुन स्वतंत्र लढणार.मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही. मी माझा स्वत:चा निर्णय घेणार. आम्ही स्वत: शेतकरी, कष्टकरी, मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ.पण त्याआधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. जर शेतकरी, दिव्यांगांच्या बाबतीत जर ते निर्णय घेणार असतील, तर आम्ही सोबत राहू.”असं वक्तव्य करत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहे.

पुढे ते म्हणाले की,”मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही. मी माझा स्वत:चा निर्णय घेणार.आमची भुमिका शेतकऱ्यांप्रती कधी ही बदलली नाही.सत्तेत असतानाना देखील आंदालने केले आहेत.सध्या आम्ही वेगळे लढत नाही आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी- मजुरांच्या बाजूचे काही निर्णय झाले तर आम्ही सरकारसोबत राहू,पण ते झालं नाही तर मग मी स्वतंत्र लढेन ” असा नारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू देखील महायुतीतून बाहेर पडणार की काय आणि त्याचबरोबर जर त्यांनी स्वतंत्र लढण्याची निर्णय घेतला तर महायुतीत बिघाडी होईल की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Latest Posts

Don't Miss