spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bacchu Kadu : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, ‘जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे…’ कडू यांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान?

अमरावतीत आज (१ नोव्हेंबर) आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा पार पडत आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी ‘मै झुकेगा नही’ चे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर खुद्द रवी राणा यांनीच हा वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, असं असलं तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती अजून वेगळीच आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते अजूनही रवी राणा यांच्यावर नाराज असलेलं दिसून येत आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून ही नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले ‘विष-अमृत नॉमिनेशन कार्य’

बच्चू कडू यांनी रवी राणा वादावर उत्तर देण्यासाठी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते लोटले आहेत. तब्बल दहा हजार कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक कार्यकर्ते कुटुंबकबिल्यासह या मेळाव्यासाठी हजर झाले झालेत. . या कार्यकर्त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना शिस्त पालन करण्याच्या वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर रवी राणा यांच्या विरोधात कोणत्याही घोषणा देऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यकर्त्यांनी आगे आगे जनता है! पिछे जमाना सारा है! मेरे बच्चू भाऊ का एक जलवा निराला है!, असं भजन गायलं. बरं एवढं गाऊन थांबतील ते बच्चू कडू यांचे कार्यकर्ते कसले? या कार्यकर्त्यांनी आणखी एक गाणं गायलं.जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे, असं गाणं हे कार्यकर्ते म्हणत आहेत. हातात वाघ आणि बच्चू कडू यांचे फलक भजन आणि गाणी गायली जात आहे. त्यावरून कार्यकर्ते रवी राणा यांच्याविरोधात संतप्त असल्याचं दिसून येत आहे.

All Saints Day 2022 : संत दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि हा दिवस का साजरा केला जातो?

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील नेमका वाद काय?

ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदारसंघातील एका कार्यक्रमात आमदार रवी राण यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात एक वक्तव्य केलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या’ है या मतदारसंघातल्या आमदाराचं ‘स्लोगन’ आहे, अशी टीका त्यांनी केली होती. बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. त्याशिवाय हा ‘तोडपाणी’ करणारा आमदार असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी रवी राणांविषयी अपशब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.

२६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे घेणार बुलढाण्यात शेतकरी मेळावा

Latest Posts

Don't Miss