Friday, September 27, 2024

Latest Posts

सतरंजी उचलणारे कार्यकर्ते या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार: Bachhu Kadu यांचा Mahayuti आणि Mahavikas Aghadi यांना टोला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता चांगलीच धुमधाम सुरु असल्याचे दिसत आहे. निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरल्याचे दिसत असून राज्यभरात ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे दौरे, यात्रा, बैठका आणि सभा पार पडत आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात थेट लढत होणार असली तरी आता या दोघांविरोधात तिसरी आघाडी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) परिवर्तन महाशक्तीचा (Parivartan Mahashakti) मेळावा पार पडला. यावेळी प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

छत्रपती संभाजीनगर शहरातील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये आज परिवर्तन महाशक्तीचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे म्हणतात, काँग्रेसवाले म्हणतात. आम्ही तुमचे भाऊ आहोत, आम्ही म्हणतो सख्खा भाऊ आहोत. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. महाशक्ती म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती. ही सामान्य माणसाची तिरंग्याची, युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची. त्याचीही महाशक्ती आहे. २००४ मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापन केला. काँग्रेसने २००६ मध्ये तो स्वीकारला आणि अंमलबजावणी झालीच नाही. २००६ पासून ते २०१५ पर्यंत काँग्रेसच होते. एक शिफारस मान्य केली नाही. मोदी आले आणि त्यांनी सांगितलं ‘भाईयो और बहनों किसान के भी अच्छे दिन आयेंगे..’ कसले अच्छे दिन? किसानांना खड्ड्यात टाकले. दुसरा, तिसरा, चौथा, आठवा आयोग मान्य होतो तर स्वामीनाथन आयोग का मान्य होत नाही? हा काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

भाजपवर टीका करत ते पुढे म्हणाले, “भाजपवाल्यांना प्रश्न आहे. तुम्ही पक्षाचे जाती-धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतो. तुम्ही हिरवा, निळा, पिवळा, लोकांच्या डोक्यात घाला. आम्ही तिरंग्यासाठी मरणार, तिरंग्यासाठी जगणार. या नवीन विचाराला समोर जाऊन लढाई लढू. आमदार ,खासदार, मुख्यमंत्री बनण्याची लढाई नाही. ही लढाई कार्यकर्ता बनण्याची लढाई आहे. पैसे न देता ही सगळे इथं जमलेले आहेत. आम्ही सर्व सतरंजी उचलणारेच आहोत ज्यांच्यासाठी टाकली होती ना त्याने सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे वाटोळं केलं. आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही,” असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss