अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऋतुजा लटके यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच आतापर्यंत अंधेरी पोटनिवडणुकीच्या प्रचारात साथ देणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी या मैत्रीची कदर करत ही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राज्यातील अनुभवी नेते शरद पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला. यासाठी मी या सर्वांची आभारी आणि कायम ऋणी राहीन, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले.

माझे पती रमेश लटके हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. सगळ्या पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र पाठवली होती. प्रत्येकजण रमेश लटके यांच्या कामाचे कौतुक करत होता, तसेच ते आपले सहकारी होते, असे सांगत होता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणे, ही माझ्या पतीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली त्यासाठी मी प्रत्येकाचे आभार मानते, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. पण, या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणारे उमेदवार मुरजी पटेल काही तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. आता पोटनिवडणुकीत आणखी काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा :

Andheri By-Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपने घेतली माघार

MCA निवडणुकीत पवार-शेलार युतीनंतर पटोले नाराज !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version