Badlapur School Case: गृहमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, बदलापूर घटनेवरून Praniti Shinde यांची मागणी

Badlapur School Case: गृहमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, बदलापूर घटनेवरून Praniti Shinde यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून देशभरातुन आणि राज्यातून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे. यावर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

खासदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या, “बदलापूरमध्ये जे घडलं, ते अतिशय अंगावर शहारे येण्यासारखं आहे. चार वर्षांच्या मूलींवर अशा प्रकारच्या घटना गोत असतील, तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. मुलींना पालकांनी शाळेत पाठवायचे नाही का, पालकांनी कामावर जायचे नाही का? गुजरातमध्ये बलात्काऱ्यांचे हार तुरे घालून स्वागत केल जातं. त्यांची पदयात्रा काढली जाते,याचा परिणाम असा दिसणार आहे. समाजाने आता सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का? राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाही. याबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,”असे त्या म्हणाल्या.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेतील चार वर्षे आणि सहा वर्षे वयाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली .

या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात चालढकल केल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अजूनही पालकांसोबत समोरासमोर कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत शाळा प्रशासन काही बोलायला तयार नसल्यामुळे पालक प्रचंड संतापले आहेत. पालक आणि बदलापूरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

Raj Thackeray on Badlapur School Case: एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून… MNS Raj Thackeray संतापून म्हणाले…

Badlapur School Case: घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी, त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप: Jitendra Awhad

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version