बच्चू कडूंना दिलासा, जामीन झाला मंजूर

राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी मिळालेल्या शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना सत्र न्यायालयानं (Sessions Court) जामीन मंजूर केला आहे.

बच्चू कडूंना दिलासा, जामीन झाला मंजूर

राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी मिळालेल्या शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना सत्र न्यायालयानं (Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

जामीन मंजूर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, परीक्षेत उमेदवार मोबाईल वापरायचे. पेपरफुटीची प्रकरणं झाली होती. त्याविरोधात केलेल्या आंदोलनात संघर्ष झाला त्यातून माझ्यावर कलम ३५३ दाखल झालं. पण या प्रकरणी माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला समन्स कधी बजावलं हे देखील मला कळालं नाही आणि थेट कोठडी सुनावली. पण आता सेशन्स कोर्टानं मला जामीन मंजूर केल्यानं मी कोर्टाला धन्यवाद देतो.

तसेच पुढे ते म्हणाले, फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणाबाबत मला पूर्ण माहिती नाही. पण हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, असा मला आत्मविश्वास आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी आशा आहे. शिंदे गटासाठी मी कडू वैगरे ठरलेलो नाही तर मी असा राहिलो असतो का? मंत्रिपद मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि ते भेटल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मला वैयक्तीक, विधानसभेत आणि मीडियासमोर पण मला मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळं ते काही थांबणार असं नाही वाटतं. वेळ लागतोय तेवढं तर चालतं त्याशिवाय मजा येत नाही, अशा मिश्किल शब्दांत बच्चू कडू यांनी आपल्या मंत्रिपदाबाबत भाष्य केलं.

नेमके प्रकरण काय ?

बचू कडू (Bachchu Kadu) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. या सुनावणीनंतर बचू कडू यांच्या समर्थकांना मोठा झटका बसला आहे. अकोल्याचे (Akola) माजी पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील (political movement) प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. पण आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) मतदार संघाचे आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील माजी राज्यमंत्री आणि सध्या शिंदे गटात अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा देणारे बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज आज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावण्यात आला आहे. न्यायलयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असतांना, त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होते.

हे ही वाचा:

लालबागच्या राजाच्या दरबारी ‘या’ तारखेला रंगणार सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

प्रहारचे अध्यक्ष बचू कडू यांना न्यायालयाकडून झटका, १४ दिवस न्यायालयीन कोठडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version