‘बाळासाहेबांचा राज’ उलघडणार काका-पुतण्याचे नाते, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी होणार पहिला प्रयोग

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील नाते एका नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या या नाटकाचे नाव 'बाळासाहेबांचा राज' असे असून हे एक दोन अंकी नाटक असणार आहे.

‘बाळासाहेबांचा राज’ उलघडणार काका-पुतण्याचे नाते, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी होणार पहिला प्रयोग

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा या वादाचा निर्णय लवकरचं होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत स्वतःचा एक वेगळा गट तयार केला; त्यांच्यात आता शिवसेना नक्की कुणाची हा वाद शिगेला पोहोचला असताना आता बाळासाहेब ठाकरे आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) प्रमुख यांच्या नात्यावर एक भावनिक नाटक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील नाते एका नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या या नाटकाचे नाव ‘बाळासाहेबांचा राज’ असे असून हे एक दोन अंकी नाटक असणार आहे. त्यामुळे आता हे नाटक नक्की काय काय गोष्टी उलघडणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

या नाटकाचा पहिला प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. हे नाटक संध्यकाळी ४ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. अनिकेत बंदरकर यांनी यांनी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर, प्रमोद गांधी हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकात कलाकार सचिन नवरे हे बाळासाहेबांची आणि प्रफुल आचरेकर हे राज ठाकरेंची भूमिका वठविणार आहेत आणि हे नाटक दोन मुख्य व्यक्तिरेखांभोवती म्हणजे राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती फिरताना दिसणार आहे. तसेच या नाटकाला सेन्सॉर बोर्डानेही ग्रीन सिग्नल दिला आहे.

बाळासाहेबांचा राज या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष अमेय खोपकर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विशेष सहकार्याने हे नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. राजू पाटील यांनीही नाटकाच्या लेखक- दिग्दर्शकाला मार्गदर्शन केल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या वादात एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगत असतात. पण, मग आता राज ठाकरे देखील या नाटकातून हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करता आहेत का? असा सवाल आता निर्माण होत आहे.

हे ही वाचा:

“दाऊद इब्राहिमने केलं दुसरं लग्न, हसीना पारकरच्या मुलाचा मोठा खुलासा

पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस सुरूच, वृद्ध जोडप्याला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version