spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Balasaheb Thackeray यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी दिग्गज नेते विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते हजर झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. तसेच बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. तसेच या सोहळ्याला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी देखील हजेरी लावली आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चर्चाना आणखी जास्त उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI भारत आणि न्यूझीलंड संघात होणार एकदिवसीय मालिकेतील शेवटची लढत, इथे पाहता येणार लाईव्ह सामना

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार?, नरेंद्र मोदींना केली विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss