दसरा मेळावा घेण्याचा मान हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा – अजित पवार यांची प्रतिक्रिया

सध्या राज्यात एकीकडे गणेश विसर्जन सुरु आहे तर दुसरीकडे दसरा मेळावा नक्की कोण घेणार हे युद्ध सुरु आहे. या दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू आहे.

दसरा मेळावा घेण्याचा मान हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा – अजित पवार यांची प्रतिक्रिया

सध्या राज्यात एकीकडे गणेश विसर्जन सुरु आहे तर दुसरीकडे दसरा मेळावा नक्की कोण घेणार हे युद्ध सुरु आहे. या दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू आहे. एकीकडे आम्हाला परवानगी मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी आम्हीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असा दावा शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे (Eknath Shinde) गट देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. अशा परिस्थितिमध्ये आता शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागले आहे. परंतु या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी नेते अजित पवार हे म्हणाले आहेत कि, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याच शिवसेनेचा असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा फडणवीसांना इशारा दिला आहे. ही बारामती आहे. बारामतीकरांना चांगलं माहीत आहे कोणतं बटन दाबायचं. ते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील. बारामतीकरांना माझं काम माहीत आहे. उगच बारामतीला धडका घेऊ नका डिपॉझिट जप्त होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर दसरा मेळावा नेमका कोणाचा याबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की खरं पाहिलं तर हा वाद निरर्थक आहे. दोन्ही गटांनी आपआपल्या परीने दसरा मेळावा घ्यावा. खर पाहिलं तर हा मान बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील असं बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरू सांगितं होतं. हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा शिवसेनेचाच असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना दिली आदरांजली! सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version