spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निष्ठा सांगत बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह गोटवायला निघाले ; केदार दिघेंचे व्यक्तव

येणाऱ्या महापालिका निवडणूक तसेच स्थनिक स्वराज संस्थेच्या निवडणूक तोंडावर असलयाने जोपर्यंत पक्षचिन्हाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षाचा चिन्ह गोठवा अशी मागणी एकनाथ शिंदे यांचे वकील निरीज कौल यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका तोंडावर आहे आणि चिन्हचा निकाल अजून लागला नसून म्हणून निकाल लागेपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशी शिंदे गटांनी मागणी करण्यात अली आहे. या आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटा वर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक बोलणारे आता बाळासाहेबांच्या चिन्हाला गोठवायला निघाले आहेत.’ असा आरोप केदार दिघे यांनी केला.

हेही वाचा : 

शिवसेनेचा याकूब मेमनच्या थडग्याशी काही संबंध नाही – अरविंद सावंत

खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न सत्तासंघर्षची तारीख २७ सप्टेंबर पर्यंत लांबणीवर गेली असून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह बदल कोणताही निर्णय घेऊ नये असे महत्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टानी निवडणूक आयोगाला दिले आहे. महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला २८ चिन्हांबाबत निर्णय घेण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुनावणीसाठी शिवसेनेच्या सदस्यांच्या अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांना पाचारण करणे व इतर काही याचिकांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मज्जाव करावा, असा अर्ज दाखल केला.

वादग्रस्त मोपलवारांचा आठव्यांदा कार्यकाळ वाढवून मिळवण्याचा प्रयत्न, दोन पदांसाठी धडपड

एखादा पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतल्यास निडणूक आयोगाला निर्णय घाव लागतो असे आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी म्हटले. मात्र उद्धव ठाकरे यांचे जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्ती वाद करत शिवसेनेच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या पक्षचिन्हाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे,असं म्हणत निवडणूक आयोगाला तूर्तास पक्षचिन्हाचा निर्णय घेऊ देऊ नका, अशी विनंती केली.कोर्टाने विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत पक्ष चिन्हावर निर्णय घेऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची मागणी केल्या नंतर आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. शिंदे गटाचे आमदार इतके धनुष्बानाला का घाबरत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.

१६ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला दिले उत्तर देण्याचे निर्देश

Latest Posts

Don't Miss