बाळासाहेब थोरातांनी जीएसटीवरून मोदींना लगावला टोला

तब्ब्ल ४० दिवसांनी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) हा झाला पण दुसरीकडे देशात महागाईचे प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यावधीत चाललेल्या महागाईमुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी केंद्रातील मोदी सरकारवरचांगलाच निशाणा हा साधला आहे.

बाळासाहेब थोरातांनी जीएसटीवरून मोदींना लगावला टोला

मुंबई :- तब्ब्ल ४० दिवसांनी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) हा झाला पण दुसरीकडे देशात महागाईचे प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यावधीत चाललेल्या महागाईमुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर चांगलाच निशाणा हा साधला आहे.

देशात महागाईचे प्रमाण हे वाढत चालले आहे तसेच युपीए सरकारच्या काळात पेट्रोल – डिझेल चे भाव (Petrol – Diesel) हे १ रुपयांनी वाढले तरी भारतीय जनता पार्टी पक्षाचे (BJP) लोक आंदोलने करायचे. भाजपचे सर्व नेतेमंडळी रस्त्यावर उतरायची आणि आता पेट्रोल – डिझेल चे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत तर आता सर्व घरात बसून आहेत. आता त्यांना आपण जाब विचारला पाहिजे असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. पुढे ते म्हणले, रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात येत आहे. या जीएसटीमुळे दैनंदिन वस्तू या महाग झाल्या आहेत. ‘जीएसटी’तून पूर्णपणे सूट असलेल्या लस्सी, दही, चीज आणि ताक यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आणि गव्हाचे पीठ, गहू, तांदूळ व इतर धान्य, मध, पापड, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, इतर तृणधान्ये, गूळ आदी कोणतीही नाममुद्रा नसलेल्या (अन-ब्रँण्डेड) पण किंमत-वजनाचे लेबल लावून पॅकबंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या किराणा सामानावर ५ टक्के दराने कर-आकारणी सुरू झाली असल्याने या वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे महागाई विरोधात काँग्रेसकडून सातत्याने विरोधप्रदर्शन सुरू आहे. आता हॉटेलमध्ये गेल्यावर तीन जण जेवले आणि त्यावर जीएसटी लागला तर चौथा व्यक्ती म्हणून मोदी जेवले, असं समजा, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला आहे.

तसेच पेट्रोल डिझेलचे (Petrol – Diesel) भावही प्रचंड वाढले आहेत. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव एका रुपयाने वाढले, तर भाजपाचे लोक आंदोलन करायचे. मात्र, आता सर्व घरात लपून बसले, असे म्हणाले. तसेच जीएसटीवरूनही पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा :-

जालन्यात ३९० कोटींचे बघाड ! तब्ब्ल १३ तास पैशांची मोजणी

Exit mobile version