Balasahebanchi Shivsena : शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

Balasahebanchi Shivsena : शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटाच्या राजकीय घडामोडींनी धुमाकूळ घातला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले असून शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे चिन्ह पाठवण्यात आले आहेत. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांच्या शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. या सर्व पार्शवभूमीवर शिंदे गटाच्या नव्या शिवसेनेने आपली पहिली शाखा उघडली आहे.

हे ही वाचा : Bharat Jodo Yatra : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ९ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचणार, शरद पवारांकडून स्वागत

 

निवडणूक आयोगाने केलेल्या नामांतरानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजयचौगुले यांच्या हस्ते मुंबईतील नेरूळ येथे पहिली शाखा उघडण्यात आली आहे. तर आगामी अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये सध्या वादावादी सुरू आहे. तर निवडणूक आयोगाने काल एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आहेत. त्यानंतर आता अंधेरी येथील पोटनिवडणुकीत दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून शिंदे गटाकडून नव्या नावाच्या पहिल्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने काल याबद्दलचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान; काँग्रेस कमिटीच्या सचिवांची माहिती

 

Exit mobile version