जळगाव जिल्ह्यात शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर फाडले

शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

जळगाव जिल्ह्यात शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर फाडले

शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पाच आमदार हे शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात जाणार आहेत. पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगाव या गावांमध्ये जाऊन आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावरील शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनर हे फाडण्यात आले आणि त्यामुळे मोठा तणाव हा निर्माण झाला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रा दौरा आज दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना आणि युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून हे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत.

शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर आणि उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर लावले आहेत. या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

 हे ही वाचा :-

रोजच्या जेवताना एका तरी डाळीचा समावेश असावा, डायबिटीज व हार्ट अटॅकचा धोका उद्भवणार नाही

भारतीय अक्षय ऊर्जा दिवस २०२२: राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिनाचा इतिहास आणि महत्त्व

Exit mobile version