spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा भाजपाचा कट होता : भास्कर जाधव

भाजप-शिंदे गट सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विधानसभेत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली.

मुंबई : भाजप-शिंदे गट सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विधानसभेत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली.

त्यावेळी भास्कर जाधव म्हणाले, गेल्या एक आठवड्यापासून मी खूप अस्वस्थ, विचलित झालोय. एकनाथ शिंदे हे आजही सभागृहात सांगतात कि मी शिवसेनेचा आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा वारसदार आहे. पण एकनाथ शिंदेंना यागोष्टीची जाणिव नाही की, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं हा भाजपाचा डाव आहे. असा आरोप भास्कर जाधवांनी यावेळी केला.

भास्कर जाधव म्हणाले की, ‘एकनाथरावजी शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढवत आहेत. यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, याठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील. आणि संपेल ती फक्त शिवसेना संपेल’,असंही जाधव म्हणाले.

पानिपतच्या लढाईत जे झाले ते आता महाराष्ट्रात होणार : भास्कर जाधव

पानिपतच्या लढाईत जे झाले ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, तर कुणाच्या हातात भोंगा दिला. पण सत्ता उलटली नाही, असे भास्कर जाधव यांनी भाजपाला सुणावले आहे.

हेही वाचा : 

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर

Latest Posts

Don't Miss