आदित्य ठाकरेंनी आखली नवीन योजना

अनेक कार्यक्रमांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत असतात. अनेकदा ते त्यांच्या नवीन उपक्रमांबद्दल बद्दल देखील सांगत असतात. नुकत्याच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नविन योजना तयार केल्या आहेत.

आदित्य ठाकरेंनी आखली नवीन योजना
शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेहमीच अनेक कार्यक्रमांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत असतात. अनेकदा ते त्यांच्या नवीन उपक्रमांबद्दल बद्दल देखील सांगत असतात. नुकत्याच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नविन योजना तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेजला तसंच शाळेत जाताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेडून महानगर पालिका शाळेत बेस्ट बस ची सुविधा देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पर्यंत रू/200 व इयत्ता  सहावी ते दहावी पर्यंत रू/-250 इतक्या सवलतीच्या दरात नवीन बसपास देण्यात येत आहे. तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हाच प्रवास केवळ 350 रुपये इतका आहे. ही योजना केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवास सोयीस्कर ठरणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी अजून काही नवीन सुविधा येणार असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवभोजन थाळी ची योजना अनेकांना आवडली तर आता ही योजना सर्वत्रच पसरत असून अनेक जण आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त करत आहेत.
Exit mobile version