भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पद मुक्त होण्याचे संकेत

भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पद मुक्त होण्याचे संकेत

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पहिला मिळालं. त्यानंतर आता भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यपाल पदमुक्त होणार असल्याचे संकेत दिसत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हंटलं जातय. राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या व्यक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

हे ही वाचा : 

तुझा अभ्यास फारच कच्चा आहे, सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना पत्र

राज ठाकरेंच्या आरोपलाला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचे प्रतिउत्तर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version