Bhagatsingh Koshyari: भगतसिंग कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नितीन गडकरींची थेट शिवाजी महाराजांशी तुलना

शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय

Bhagatsingh Koshyari: भगतसिंग कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नितीन गडकरींची थेट शिवाजी महाराजांशी तुलना

राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे सातत्यानं महाराष्ट्रातील महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह ज्योतीबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची केल्यानं ते पुन्हा नव्या वादात अडकले आहेत. त्यामुळं आता नव्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली जात आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिक्षांत समारोह सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी-लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

यावेळी बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले. भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे. आजच्या नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यपाल कोश्यारी हे वाचाळवीरासारखे वळवळ करत असतात. त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असले धंदे बंद करायला हवेत, अशा शब्दांत संतोष शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सुनावलं आहे.

यापूर्वी देखील शिवाजी महाराजांबद्दल केले होते वादग्रस्त विधान…

यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त बोलले होते. “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” या विधानावरुनही राज्यात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

हे ही वाचा:

Kedar Dighe Exclusive : पोलीस यंत्रणांवर दबाव आणून, राजकरण केलं जात आहे… ; केदार दिघे

Kedar Dighe Exclusive : हा एकमेव असा नेता होता कि त्यांनी स्वार्थ कधी बघितला नाही – केदार दिघे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version