भरत गोगावलेनी केला गौप्यस्फोट , राजकीय नेत्यांकडून नवीन चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी आज केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. गोगावले यांनी आपलं मंत्रीपद कसं हुकलं, याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यावर आता प्रतिक्रिया येत असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत विधान केलं आहे.

भरत गोगावलेनी केला गौप्यस्फोट , राजकीय नेत्यांकडून नवीन चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी आज केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. गोगावले यांनी आपलं मंत्रीपद कसं हुकलं, याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यावर आता प्रतिक्रिया येत असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत विधान केलं आहे. ठाणे येथील रुग्णालयाला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार बोलत होते. शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मंत्रीपद कसे घेतलं आणि मिळालेली संधी कशी हुकली, याचा किस्सा गोगावले यांनी सांगितला आहे. तसेच, आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, असं गोगावलेंनी म्हटलं.

वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमध्ये किती आलबेल आहे, हे भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरुन दिसते आहे. ही निव्वळ सत्तेची साठमारी आहे. आता तिजोरी लुटण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटलं की, सगळे पर्याय संपले की भाजपला गांधी परीवार दिसतो. असं आहे तर मग त्यांना राष्ट्रवादीची गरज का पडते आहे? पंतप्रधान पदी गांधी घराण्यातील कोण होते? त्यांनी केवळ गांधी घराण्याची भीती वाटते, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूवर वडेट्टीवार म्हणाले की, ठाण्यात परमन्ट जागा भरल्या जात नसतील तर इतर राज्यात काय परीस्थिती असेल, हे सांगायची गरज नाही. ते पुढं म्हणाले की, कळवा हॅास्पिटलमध्ये तज्ञ डॅाक्टर नाहीत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पॅरामेडीकल स्टाफ नाही. छ. शिवाजी महाराजांचे नाव घेवून हे हॅास्पिटल सुरु केले गेले. या रुग्णालयाची लागलेली वाट पाहता त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे हॅास्पिटल सरकारकडे द्यावे अशी मागणी केली होती, अशी आठवणही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हे ही वाचा: 

नवाब मलिक यांनी सांगितलेच…. मी यांच्यासोबतच …

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version