spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

G20 परिषदेत पंतप्रधानांसमोर लावलेल्या नावाच्या फलकावर INDIA ऐवजी BHARAT…

देशाची राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटनपर भाषण केले.

देशाची राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटनपर भाषण केले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी जगातील मानवतेच्या कल्याणाविषयी भाषण केले. येथे सर्वात मनोरंजक गोष्ट अशी घडली की, जी -२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींची नेमप्लेट (Nameplate) पाहिली गेली. जेथे, पंतप्रधानांसमोर लावलेल्या नावाच्या फलकावर इंडिया (INDIA) ऐवजी भारत (BHARAT) असे लिहिले आहे. सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत (India vs Bharat) अशी जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे इंडिया नाव बदलून भारत केले जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

G-20 शिखर बैठकीमध्ये PM मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर INDIA ऐवजी इंग्रजीत BHARAT लिहिलेले दिसले. अशा स्थितीत देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खऱ्या आहेत का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदींकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात राष्ट्रपतींऐवजी (BHARAT) भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध करत प्रतिक्रिया दिल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना राजकीय वाद टाळण्याच्या सूचना दिल्या.

यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, “आशा आणि विश्वासाचे नवीन नाव – भारत.” जेव्हा एखाद्या देशाची अधिकृत बैठक होते, तेव्हा त्या देशाचे नावही त्याच्या प्रतिनिधीसमोर फलकावर लिहिलेले असते, त्यावरून असे दिसून येते की सभेला उपस्थित असलेली व्यक्ती त्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

हे ही वाचा: 

G 20 परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले ?

Asia Cup 2023 IND vs PAK, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठा निर्णय, पाऊस आला तरी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss