spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा ९०० किमी प्रवास पूर्ण

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) आज (१२ ऑक्टोबर) ३५ वा दिवस आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा (Bharat Jodo Yatra) आज (१२ ऑक्टोबर) ३५ वा दिवस आहे. ७ सप्टेंबरला तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून (Kanyakumari) ही यात्रा सुरु झाली होती.

 राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सात सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. पुढे जात ही यात्रा केरळहून ३० सप्टेंबरला कर्नाटकात दाखल झाली होती. कर्नाटकातील ही यात्रा २१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. वास्तविक, कर्नाटकात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष वेगळ्या रणनीतीवर काम करत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहा ऑक्टोबरला कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत हजेरी लावली होती. आत्तापर्यंत ९०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये सुरु आहे. कर्नाटक राज्यात ५११ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा पूर्ण करणार आहे. आज चित्रदुर्ग जिल्ह्यातील छल्लाकेरे इथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.

 काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी गेल्या महिनाभराहून अधिक काळ ‘भारत जोडो यात्रे’अंतर्गत रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेने नुकतेच ९०० किलोमिटरचा टप्पा पूर्ण केला आहे. यादरम्यान काँग्रसने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘भारत जोडो यात्रे’च्या ३५व्या दिवसाची आज सकाळी ६.३० वाजता कर्नाटकातील चित्रदुर्गातील चल्लाकेरे येथून सुरुवात झाली. पदयात्रा सकाळी ११ वाजता विश्रांतीसाठी थांबेल आणि ४ वाजता हिरेहल्ली येथे जाण्यासाठी पुन्हा सुरू होईल. जिथे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय विद्यालयात पदयात्रा रात्री थांबेल.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss