spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत जोडो यात्रा ७ नाव्हेंबरला महाराष्ट्रात; काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने देशाचे लक्ष वेधले आहे. या यात्रेचे नैतृत्व राहुल गांधी करीत आहेत. ७ नाव्हेंबरपासून ही यात्रा महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेची पूर्वतयारी राज्य काँग्रेसकडून पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या यात्रेचे निमंत्रण काँग्रेस शिष्टमंडळाने आज दिले. या शिष्टमंडळाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

सात नोव्हेंबर पासून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सहभागी व्हावे, यासाठी निमंत्रण काँग्रेस शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन दिले आहे. यावेळी उभयंतात चर्चाही झाली. काँग्रेस शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन त्यांनाही निमंत्रण दिले. या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधान परिषदेतील गटनेते अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप माजी मंत्री प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार डॉ. सुधीर तांबे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी हे होते.

नाना पटोले यांनी एक व्हिडीओ ट्विट केले, यात ते म्हणाले की, सोनिया गांधींचे कार्यकर्ते, राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. आम्ही राजीव गांधी, इंदिरा गांधींचे कार्यकर्ते आहोत, या नेत्यांनी देशाला दिले, आम्ही घेणाऱ्यांपैकी नाही. या देशाला समर्पण असणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही वाट्याच्या राजकारणात पडणारे नाही आणि पडणार नाही. काँग्रेस देशात राजकारण कमी आणि समाजकारण कमी करते, हे या देशाने आतापर्यंत पाहिले आहे.

हे ही वाचा :

‘आनंदाचा शिधा’ आदेश का आश्वासन ?

आयशर-रिक्षाच्या भीषण अपघा पाच ठार, दोन जखमीतात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss