Bharat Jodo Yatra : सोनिया गांधी आज ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

सध्या देशाच्या राजकारणात (Indian Politics) दसरा मेळावा पाठोपाठ अजून एका विषयाची जोरदार चर्चा चालू आहे. ती म्हणजे, गांधी परिवाराव्यतिरिक्त काँग्रेसचा (Congress) नवा अध्यक्ष.

Bharat Jodo Yatra : सोनिया गांधी आज ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

सध्या देशाच्या राजकारणात (Indian Politics) दसरा मेळावा पाठोपाठ अजून एका विषयाची जोरदार चर्चा चालू आहे. ती म्हणजे, गांधी परिवाराव्यतिरिक्त काँग्रेसचा (Congress) नवा अध्यक्ष. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांना उमेदवारी दिल्यानं पक्षात खळबळ उडाली आहे. यासर्व घडामोडींसह सध्या देशभरात सुरु असलेली राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ही (Bharat Jodo Yatra) चर्चेत आहे.

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ही सुरु आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकात असून आज या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी होऊ शकतात, अशी माहिती देखील मिळत आहे. कित्येक दिवसांनी सोनिया गांधी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी सोनिया गांधी राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. सोनिया गांधी सकाळी मंड्या जिल्ह्यातील जक्कनहल्ली येथून पदयात्रेत सामील होणार असल्याचं कळतंय. एवंढच नाहीतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारत जोडो पदयात्रेत सामील होणार असून राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी चालणार असल्याचीही माहिती मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन काही अंतर कार्यकर्त्यांसोबत चालणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. आपल्या अध्यक्षांनी भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा केल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पक्षाप्रति निष्ठाही वाढल्याचं दिसून येऊ शकतं, असं देखील सांगितले जात आहे.

केरळपासून कर्नाटकपर्यंतची राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रा सध्या चर्चेचा विषय आहे. या यात्रेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकजण या यात्रेचं स्वागत करत आहेत. तर कहीजण यात्रेवरुन गांधी कुटुंबीय आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. ४ सप्टेंबर रोजी सोनिया गांधी कर्नाटकात पोहोचल्यात. अशातच आज त्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. चार दिवसांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सामील होतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपचे बॅनर्स फाडले

आनंद दिघेंवरुन एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version