spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ विदर्भात दाखल, एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा मराठवाड्यातून आज मंगळवारी (ता. १५ नोव्हेंबर) सकाळी ६.३० वाजता विदर्भात दाखल झाली. पैनगंगा नदी ओलांडून ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावर वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या यात्रेचे, तसेच राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात येईल. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जवळा वरखेड या गावातील आणि परिसरातील जवळपास एक हजार वारकऱ्यांनी राहुल गांधींच्या स्वागताची तयारी केलेली आहे. पदयात्रा मार्गाच्या बाजूच्या शेतामध्ये वीस फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्या मूर्तीभोवती रिंगण सोहळा आयोजित करुन राहुल गांधी यांचं बुलढाणा जिल्ह्यात स्वागत करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील यात्रेच्या प्रवासानंतर ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल. यात्रा राजगावमार्गे वाशीम शहरात दाखल होईल. वाशीम शहरात पोलिस ठाणे चौकात दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांची कॉर्नर सभा होणार आहे. त्यानंतर अकोला नाका येथील सरनाईक महाविद्यालयात यात्रेचा मुक्काम असेल.

हेही वाचा : 

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांच्या मध्यरात्रीच्या बैठका सुरूच; नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा

येत्या १८ तारखेला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे येणार आहे. शेगाव-बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील या मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याच्या चार एकर शेतात२० फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे देखील वारकऱ्यांचा वेष परिधान करुन त्यांच्यासोबत पावलं टाकत रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत.

या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या बोथबोडनसह किन्ही, मनपूर, इचोरी, वाटखेड या गावांतील शेतकरी विधवा महिला निघाल्या असून, राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ५० हून अधिक महिला भारत जोडो पदयात्रेत चालणार आहेत. २००८ मध्ये राहुल गांधी यांनी बोथबोडन येथे जाऊन शेतकरी आणि शेतकरी विधवांसोबत संवाद साधला होता. त्यानंतर आता पुन्हा राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने शेतकरी विधवा महिलांचे दुःख जाणून घेतील.

मुख्यमंत्री शिंदेंनी एका बैठकीत वाचली नव्या पुस्तकाची ‘इतकी’ पानं!

‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक

‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक करताना भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या सुमित्रा महाजन म्हणाल्या, महापुरुषही आधी देश फिरले. मी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा महापुरुषांचे उदाहरण देत होते. जेवढ्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, ते आधी देश फिरले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे एका युवा अर्थात राहुल गांधी यांना देश फिरायची इच्छा झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे. ते स्वत: देश समजून घेत आहेत. ही गोष्ट चांगली आहे, अशा शब्दात सुमित्रा महाजन यांनी राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक केले आहे.

Thackeray vs Shinde : ठाण्यातील किसन नगर येथे, शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी

Latest Posts

Don't Miss