उद्या पासून महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेला सुरवात

उद्या पासून महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेला सुरवात

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेचं स्वरुप नेमकं कसं असेल, याची माहिती आज अशोक चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे आज नांदेडमध्ये दाखल झाले. अशोक चव्हाण यांनी या नेत्यांसह आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रा उद्या महाराष्ट्रात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता ही यात्रा लातूर जिल्ह्यातल्या देगलूर येथे पोहोचेल. त्यानंतर मशाल यात्रा निघणार आहे आणि नांदेड येथे मुक्काम.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी असणारे अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. रात्री देगलूर वन्नाळी ( प्रसिद्ध गुरुद्वारा ) अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे नऊ किमीचं अंतर असेल. रात्री साडेबारापर्यंत तिथली पूजाअर्चा करुन परत येताना देगलूरला राहुल गांधी कारने येणार आहेत. आठ तारखेला सकाळी पुन्हा कारने वन्नाळीला जाणार आहेत. तेथून यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. रात्रीचा मुक्काम शंकरनगरला असेल , त्याआधी गोपाळा गावात कॅार्नर मीटिंग होणार आहे. दहा तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नांदेडमध्ये येणार आहेत. त्याशिवाय या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही दहा तारखेला यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील २८ पदाधिकारी मदतीसाठी नियुक्त केले आहेत. या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी आहे. नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यात्रेसाठी २८ पदाधिकारी नियुक्त केले आहेत. सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झालेत. नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. देगलूरहून सुरू होणारी भारत जोडो यात्रेसाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरदचंद्र पवार यांच्या सह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे.

हे ही वाचा :

आलिया आणि रणबीरला झाली मुलगी; तर करण जोहर होतोय ट्रोल ?

बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टींचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version