भास्कर जाधवांची शिंदेगटावर टीका बीकेसीतला मेळावा कचरा मेळावा आहे…

दसरा मेळावे दोन आहेत पण मी म्हणालो की दसरा मेळावा तर शिवतीर्थावर आहे तर बीकेसीतला कचरा मेळावा आहे.

भास्कर जाधवांची शिंदेगटावर टीका बीकेसीतला मेळावा कचरा मेळावा आहे…

भास्कर जाधवांनी शिंदेंना गद्दार म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला म्हणाले पक्षातील एका गद्दाराच्या त्यांना राजगदीवरून खाली ओढलं याच दुःख आहे. पत्रकार मला कालपासून विचारत होते. दसरा मेळावे दोन आहेत पण मी म्हणालो की दसरा मेळावा तर शिवतीर्थावर आहे तर बीकेसीतला कचरा मेळावा आहे. खुद्दारांचा मेळावा इथं होतोय तिथं तर गद्दारांचा मेळावा होतोय. स्वतःची चटणी भाकरी खाऊन लोक इथं आलेत. उद्धव ठाकरेंना पाठींबा द्याला आलेत तर तिकडे पन्नास खोकेवाले आलेत. त्यानंतर त्यांनी एकच मैदान, एकच नेता, एकच झेंडा आणि तेवढा एकाच दसरा मेळावा मला माहीर आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

अरे ती माय माऊली तळमळली तिच्या आत्म्याला पिळ पडला आणि तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की जा आज या सत्तेला तुम्ही काय नाव दिली. त्या मायमाऊलीला तुम्ही सांगितलं की आमची शिंदेशाही आहे. पण ती माय माऊली हळूच म्हणाली ही शिंदेशाही नाही मोगलशाही आहे, अशा शब्दांत शिंदे गटावर त्यांनी निशाणा साधला.

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी आपल्या उतारवयात आमच्यासमोर वचन घेतलं आम्हाला विनंती केली की, माझं आता वय झालय तुम्ही माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. पण त्याच उद्धवना आम्ही गादीवरुन खाली खेचलं.

हे ही वाचा:

सुभाष देसाई दसरा मेळाव्यातून थेट…

किशोरी पेडणेकर दसरा मेळाव्यातून थेट..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version