spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा; चित्र वाघ

शिवसेना आमदार आणि नेते भास्कर जाधव यांनी सभेमध्ये चित्र वाघ यांची नक्कल केली त्यानंतर चित्र वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करतान त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून माझ्या नादी लागू नका सांगत जोरदार टीका केली आहे.

 चित्र वाघ म्हणल्या की “ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा,” अश्या शब्दात भास्कर जाधव यांना सुनावलं आहे.

संजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत? असा खोचक प्रश्न विचारला. “त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला, ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली, त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशापद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली,” असं जाधव यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदांचा उल्लेख करत नक्कल केली. “त्या भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ रोज सकाळी यायच्या आणि आहो राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो. तुम्हाला खूप चांगलं समजतो. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. या माऊलीला न्याय द्या असं सांगायच्या. आज चित्रा वाघ कुठं आहेत?” असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच उपरोधिकपणे टीका करताना म्हणाले की “आज त्या माऊलीला न्याय मिळाला असेल, तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. ज्या संजय राठोडांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला त्यांनाच भाजपाचं सरकार आणण्यासाठी सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं गेलं. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळाला”.

हे ही वाचा :

Uunchai : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या ‘ऊंचाई’चा ट्रेलर रिलीज

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 न्यू इलेक्ट्रिक बाईक, या महिन्यात होणार लॉन्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss