spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून विधानसभेत भुजबळांची टोलेबाजी !

पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणाबाजी या हळू होत्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणाबाजी या होत होत्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. त्यावेळी छगन भुजबळ यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यात जीएसटी वरून मुद्दा मांडताना छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून चांगलीच टोलेबाजी केली आहे.

यावेळी त्यांनी काळ्या पांढऱ्या दाढीवरुन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. छगन भूजबळ यांनी जीएसटीवरुन मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी दाढीवरुन टोलेबाजी केली. जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट होत आहे. एक गोष्ट सुटलेली नाही. फक्त भाषणावर तुम्ही जीएसटी लावेला नाही. सर्व सामान्यांवर फार वाईट परिणाम होत आहे. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच छगन भुजबळ पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळंच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. असा टोला जिएसटी वरुन छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

दरम्यान, यावेळी छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटा काढला. “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :-

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नापुढे शिंदे सरकार ठरले असमर्थ

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, रस्त्यावर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

Latest Posts

Don't Miss