शरद पवारांकडून भुजबळांची स्तुती ; त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही…

शरद पवारांकडून भुजबळांची स्तुती ; त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी महाविकास आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते. भुजबळांबद्दल बोलताना पवार म्हणाले की, ते सुरुवातीच्या काळात भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावेळी मुकुंद ठकोजी पाटील, व्ही डी जुथे यांनी भुजबळ कुटुंबाला मदत केली होती. त्याचं दुकान जाणार होतं. मात्र या दोघांनी ते दुकान वाचवलं. त्यानंतर भुजबळ यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलं. महापौर झाले, आमदार झाले. त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांनी विविध पदे भूषवली, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील सर्वात उत्तम वास्तू बांधली. यासाठी एक रुपया देखील खर्च होऊ दिला नाही. भुजबळांचा आज सत्कार केला. त्यांना सत्कारावेळी फुले पगडी घातली असती तर चांगलं झालं असतं. भुजबळ जी कामं करतात त्यांच्या पाठिशी आपण सगळे उभे आहोत, असंही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. “आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे,” असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं.

तसेच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव देण्यासाठी छगन भुजबळ यांचं योगदान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. दिल्लीत सगळ्या राज्य सरकारांची निवासस्थाने आहेत. त्यात महाराष्ट्राचं निवासस्थान सर्वात उत्तम आहे. लोक विचारतात हे कोणी बांधलं. ही वास्तू भुजबळ यांनी उभारली. पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देण्यासाठी भुजबळ यांचं योगदान मोठं आहे. हे कोणाला माहित नाही, असंही पवार म्हणाले. यावेळी पवार म्हणाले की, या देशात काश्मीर राहिलं, त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठ आहे. अब्दुल्ला कुटुंबाची संपूर्ण निष्ठा कायम भारताच्या ऐक्याशी आहे, असंही पवार यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित होते.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, डॉ.फारुख अब्दुल्ला, डॉ.जावेद अख्तर, अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सामंत यांनी छगन भुजबळ यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आले.

हे ही वाचा :

Andheri By Poll Election : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया…

हिंगोलीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीकविमा कंपनीविरोधात शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version