भाजपला मोठा धक्का, नाशिकमधील आमदाराच्या भावाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

मुंबईत झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपला मोठा धक्का, नाशिकमधील आमदाराच्या भावाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

राज्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात चढाओढ सुरु आहे. परंतु अशातच नाशिकमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. काहीच दिवसात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. अशातच नाशिकमधून भाजपसह (BJP) आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना मोठा धक्का बसला आहे.

नाशिकमधील आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील (Bhalchandra Patil) यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड (Akash Chajed) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रामुख्याने यात भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील (Bhalchandra Patil) यांचा समावेश होता. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण हिरे कुटुंबाकडून देण्यात आले आहे.

मुंबईत झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये आमदार हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई (Guddu Gavai), सिडकोतील सुमित सोनवणे (Sumit Sonwane) यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा प्रभारी राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच प्रमोद मोरे (Pramod More), देवानंद पवार (Devanand Pawar), विजय पाटील (Vijay Patil), अल्तमस शेख (Altamas Sheikh) हे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

शिंदे सरकारने घेणतला मोठा निर्णय, Versova-Bandra Sea Link चे नाव बदलले, आता…

Parliament Monsoon Session, यंदाचं अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात? जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version