जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेस (Congress) या पक्षामधून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देऊन पक्षाला एक मोठा धक्का दिला. आता त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेस (Congress) या पक्षामधून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देऊन पक्षाला एक मोठा धक्का दिला. आता त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद (Former Deputy Chief Minister Tara Chand) यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) ६४ नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या राजीनाम्यावर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी एक खोचक वक्तव्य केले आहे. गुलाब नबी आझाद म्हणाले, “सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील.” काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व ६४ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत. तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री माजीद वाणी, डॉ मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा ही नावे आहेत.

 

हे ही वाचा :- 

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

शिंदे गटांकडून बीएमसी निवडणुकीसाठी नवीन शिलेदारांची निवड

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version