हसन मुश्रीफ यांना मोठा झटका, जिल्हा बँकेचे ५ जण चौकशीसाठी ताब्यात

हसन मुश्रीफ यांना मोठा झटका, जिल्हा बँकेचे ५ जण चौकशीसाठी ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून कालपासून कसून तपासणी सुरु आहे. ईडीनं चौकशीदरम्यान पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळं इतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून जर ईडीनं (ED) त्यांना त्रास दिला तर ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करु, असा इशारा कर्मचारी संघटनेनं दिला आहे. विशेष म्हणजे ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून जिल्हा बँकेत दोन वेळा धाड टाकण्यात आलीय. ईडीकडून आजही बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीने जिल्हा बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Kolhapur District Central Bank) चेअरमन आहेत. बुधवारी १ फ्रेबुवारी २०२२ रोजी सकाळीच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. ईडीचे अधिकारी सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हा बँकेतील कागदपत्राची तपासणी करत आहेत. तपासादरम्यान बँकेच्या पाच जणांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेल्याचे समजते. आम्ही स्वतःहून ईडी ऑफिस मध्ये चौकशी साठी येतो. पण आत्ता कोणाला ताब्यात घेवू नका अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. यामुळे बँकेबाहरे मोठी गर्दी आणि तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.

जिल्हा बँकेत पूर्वी जे झालं ते दुरुस्त करण्यात आम्ही होतो मोर्चे काढून एका वर्षात ३७० कोटी रुपये वसूल करुन बँक आम्हीच वळणावर आणली. त्यानंतर इथं पुन्हा चुकीचं काही होऊ नये म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. ईडीला चौकशीला अधिकार आहे पण या चौकशांपुढं काय होतं हे आम्हाला माहिती आहे, असंही कर्मचारी संघटनेनं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यात डेब्यूसाठी तयार, ट्विट करत स्वतःच दिली माहिती

अंडर-१९ संघाचे भारतात आगमन, ढोल-ताश्यांच्या गजरात झाले जोरदार स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version