एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्यांवर केली मोठी कारवाई

राज्याच्या राजकारणात मोठं मोठ्या घडामोडी घडत असतानाच अजून एक मोठी घडामोड हि घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ नेत्यांवर केली मोठी कारवाई

राज्याच्या राजकारणात मोठं मोठ्या घडामोडी घडत असतानाच अजून एक मोठी घडामोड हि घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई झाली आहे. येथील माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नगरपालिकेचा (Nagarpalika) कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र याच समर्थकांवर आता मोठी कारवाई झाली आहे.

जळगावात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी एकनाथ खडसे प्रयत्न करत असतानाच नुकत्याच झालेल्या कारवाईने खडसे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे तत्कालीन नगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षासाठी निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत.

निलंबित झालेल्या सदस्यांची नावे – 

रमण देविदास भोळे
अमोल इंगळे
लक्ष्मी रमेश मकासरे
प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे
मेघा देवेंद्र वाणी
बोधराज दगडू चौधरी
शोभा अरुण नेमाडे
किरण भागवत कोलते
शैलजा पुरुषोत्तम नारखेडे
पुष्पाताई रमेशलाल बतरा

हे ही वाचा :

Maharashtra Municipal Corporation Election Hearing : महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच एकाच व्यसपीठावर उपस्थित राहणार पवार, फडणवीस अन् cm शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version