राष्ट्रवादीला मोठा धक्का, खासदारच सदस्यत्व रद्द

राष्ट्रवादीला मोठा धक्का, खासदारच सदस्यत्व रद्द

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला आणि राज्यामध्ये असलेलं महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळलं. त्यानंतर महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांची अडचण वाढली आहे. आज महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोकसभेतील एक खासदार आता कमी झाला आहे. यामुळे त्यांची लोकसभेतील पॉवर अजून कमी झालायचं बोलण्यात येत आहे. लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) एका सदस्याचे सदसत्व रद्द केले आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र (ineligible) ठरवणारी अधिसूचना (Notification) जारी केली आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा (murder) प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुद्धा झाली. यामुळे मोहम्मद फैजल (Mohammad Faisal) याचं येत्या ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली आहे.

राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात अली आहे. न्यायलयाच्या या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढली. त्यात असं म्हटले आहे की, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने (Sessions Court at Kavaratti) दोषी ठरवल्याच्या तारखेपासून ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ (१)(ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ मधील तरतुदीप्रमाणे घेतला आहे. मोहम्मद फैजल १६ व्या लोकसभेत निवडून आले होते. त्यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना पराभूत केले होते.

माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद (Former Union Minister PM Saeed) यांचे जावई मोहम्मद फैजलवर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया (Congress leader Mohammad Salia) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलिया यांच्यावर जमावाने हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. फैजल यांनीच जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. मोहम्मद सलिया यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. या प्रकरणात ३२ जणांना आरोपी ठरवले होते. त्यापैकी चार जणांना दोषी ठरवले त्यात मोहम्मद फैजलचाही समावेश होता.

हे ही वाचा:

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Nashik Padvidhar Election, सत्यजीत तांबेच्या अडचणी वाढणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version