फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, नेते-पदाधिकाऱ्यांना दिले iPhone वापरण्याचे आदेश

फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, नेते-पदाधिकाऱ्यांना दिले iPhone वापरण्याचे आदेश

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून भजप आणि शिवसेना पक्षामध्ये वाद विवाद सुरु आहे. तर अलीकडे भाजप आणि ठाकरे सरकार असताना विरोधकांकडून त्यांच्यावर फोन टॅपिंगचा (Phone Tapping) आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर सावधानी बाळगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातील मुख्य पदाधिकाऱ्यांना आणि नेते, उपनेते, आमदार, खासदारांच्या पीएसह सर्व स्टाफसाठी आदेश जरी केले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्व मुख्य पदाधिकारी आणि नेते, उपनेते व इतर सर्वांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत ठाकरे गटाचा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माहिती दिली आहे. म्हणून पुन्हा फँटॅपिंग प्रकरणाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

याबाबद बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितलं की “आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार सर्व विरोधकांना आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या असल्याचे दानवे म्हणाले. याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. पण जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे. कारण अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो. अशातच काळजी घेतली पाहिजे, कारण मागच्या काळात रश्मी शुक्ला यांना सरकराने फोन टॅपिंग करण्यास सांगितले होते. त्यामुळे आताच्या घडीला सुद्धा सरकारचं जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष असू शकत.” असे अंबादास दानवे यांनी सांगितलं.

अंबादास दानवे (Ambadas Danve) या संदर्भात पुढे म्हणाले की “मागच्या काळात फोन टॅपिंगच्या घटना घडल्या आहेत. तसेच आत्ताच्या सरकारला कोणतेही साधनसुचिता राहिली नसून, ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात.त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. पण त्यांचं लक्ष आहे म्हणून काही घाबरून जाण्याची गरज नाही. शिवसेनेला जे काही करायचं ते समोरा समोर करते. पण तरीही मी माझ्या येथील सर्व पदाधिकारी यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण “. असे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं?, अर्थसंकल्प सादरीकरणावर संजय राऊतांची टीका

Vande Bharat Express संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

Follow Us

Exit mobile version