राज्य सरकारचा मोठा निर्णय, धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ बोनस

राज्य सरकारचा मोठा निर्णय, धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ बोनस

Maharashtra Assembly Winter Session : सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ५ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती राज्य विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधिमंडळात विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केली. पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. तसं महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई जवळ आणली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरला जवळ आणण्याचं काम केलं आहे. समृध्दीच्या वेळी आमच्याही आमदारांना विरोध करायला लावला. जमिनी देऊ नका म्हणून सांगण्यात आलं. समृध्दीमुळे सगळ्यांची समृध्दी झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्धी महामार्गामुळे केवळ वाहनांची ये-जा सुरु झालेला नाही. तर याचाच उपयोग करून घेऊन आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार आहोत. एरव्ही संभाजीनगरहून नागपूर- अमरावती (Nagpur- Amravati) किंवा अगदी गडचिरोलीपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागायचा. विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनीज, उर्जा, पाणी,वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल. याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Maharashtra Samruddhi Mahamarg)माध्यमातून झाली आहे, असं ते म्हणाले.

हे ही वाचा:

बांबू चित्रपटामध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये? हे नाश्त्याचे बिल होतेय सोशल मीडियावर व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version