spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?, शरद पवार भाजपला देणार आणखी एक मोठा धक्का…

राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि या लोकसभा निवडणुकीत एक वेगळंच चित्र सर्वांच्या समोर आले त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या विधानसभा निवडणुकींकडे लागले आहे.

राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि या लोकसभा निवडणुकीत एक वेगळंच चित्र सर्वांच्या समोर आले त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या विधानसभा निवडणुकींकडे लागले आहे. विधानसभा निवडणुका या तोंडावर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना मात्र एक वेगळाच वळण लागलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या चांगलेच ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्यासह इतर पक्षातील नेते देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक पक्षाने त्यांची विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आखली आहे. अशातच शरद पवारांनी मात्र त्यांचा एक एक पत्ता टाकण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापुरात मात्र भारतीय जनता पार्टीला आता चांगलाच मोठा धक्का बसला आहे.त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्येदेखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. इंदापूरमधील बॅनरने लक्ष वेधलं आहे. इंदापूरच्या आठवडे बाजार आणि आज एक फ्लेक्स भरचौकात लागला होता. त्यावर शरद पवार पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर लक्ष वेधून घेत आहे. ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी… हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss