spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनमोहन सिंघ यांना वाढदिवसानिमित्त बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्या,जाणून घ्या माजी पंतप्रधान विषयी माहिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पाठवल्या आहेत. आणि त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

“देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा. त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

माजी पंतप्रधान सिंग यांना ट्विटरवर शुभेच्छा देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिले की, “भारतातील सर्वोत्कृष्ट राजकारणी डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांची नम्रता, समर्पण आणि भारताच्या विकासातील योगदान याला काही समांतर नाही. ते माझ्यासाठी आणि इतर करोडो भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. मी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.”

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव तापाने फणफणला होता, व्हिडीओ झाला व्हायरल

मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस असून ते ९० वर्षांचे झाले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला. २००४ ते २०१४ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यापूर्वी, डॉ. सिंग १९७१ मध्ये भारत सरकारमध्ये सामील झाले जेव्हा त्यांची वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनमोहन सिंग यांनी १९९१ ते १९९६ दरम्यान पाच वर्षे भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले. या काळात आर्थिक सुधारणांतील त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे.

हेही वाचा : 

२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन, पटियाला हाऊस कोर्टाने दिला दिलासा

मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर पाहता, डॉ. सिंग हे १९९१ पासून भारतीय संसदेच्या (राज्यसभा) वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. तेथे ते १९९८ ते २००४ दरम्यान विरोधी पक्षनेते होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी २२ मे रोजी २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आणि २२ मे २००९ रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते सलग दहा वर्षे पंतप्रधान होते.

Latest Posts

Don't Miss