spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गद्दार दिन यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी दिली प्रतिक्रिया, हळू हळू बंडाचे खरे स्वरुप…

तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे दिवस साजरे केले जात आहेत. यावर अखेर शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वृक्ष हे पूर्ण झाले आहे. आजच्याच दिवशी एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून काढता पाय घेतला आणि त्यामुळे शिंदे गट तयार झाला. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच दिनांक २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केला. आज या संपूर्ण घटनेला १ वर्ष पूर्ण झाले आहे. तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे दिवस साजरे केले जात आहेत. यावर अखेर शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आज दिनांक २० जून रोजी जी २० समिट अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आज नवी मुंबईतील खारघर मध्ये रन फॉर एज्युकेशन रॅलीचे आयोजन हे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी खाजगी शाळांच्या फीवर आमचे नियंत्रण नसते. मात्र कोरोना काळात ज्या शाळांनी दाखले द्यायला नकार दिला, तेव्हा मी इतर शाळांत प्रवेश घेताना विना दाखला प्रवेश दिला जावा असा जी आर काढला. मात्र ज्या ठिकाणी चुकीचे घडत असेल त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक समिती बनवली आहे. जी इतर सरकारी शाळाप्रमाणे खाजगी शाळांच्या ऑडिट मागवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाईल असे ते म्हणाले. तसेच पुढे त्यांनी गद्दार दिन यावर देखील भाष्य केले आहे.

पुढे बोलत असताना दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे ते वागले नाहीत ते १०० टक्के राजकारण करतात. त्यांनी गद्दार दिन जरूर साजरा केलाच पाहिजे कारण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली त्यामुळे त्यांनी गद्दार दिन साजरा करावा. हळू हळू खरं स्वरूप या बंडाचा लोकांसमोर येत आहे असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, हे बंड स्वाभिमानासाठी झालं होतं. आमचा असा एक नेता जो आमचा विधानसभेला नेता होता. आमदारांचे सुख दुःख जाणून घ्यायचा. आमदार आजारी पडले की ॲम्बुलन्स पाठवायचा अशा नेत्याला डावललं गेलं. त्यांनी कार्यकर्त्यांना अधिकच प्रेम दिले होते. मात्र ठाकरेंकडून प्रेम मिळाले नाही आमच्यासारखे आमदार दोन दोन तीन महिने वर्षाच्या बाहेर उभे राहिले हा आमचा अपमान नाही का ? असा सवाल देखील केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच दीपक केसरकर पुढे म्हणाले आहेत की, ज्या विचारणे आम्ही या पक्षात आलो ते विचार जर नसेल तर पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणून ती भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली आम्ही सगळ्यांनी घेतली. आणि तीच खरी शिवसेना आहे. ही भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली. बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत.

तसेच दीपक केसरकर पुढे म्हणाले आहेत की, ज्याप्रकारे मोदी साहेबांना स्टेजवरून बोललं जातं, ते योग्य नाही, बाळासाहेब म्हणाले होते मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी ३७० कलम रद्द करून दाखवतो, राम मंदिर बांधून दाखवतो. तेच मोदींनी केले बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी साकार केले आणि त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही. बाळासाहेबांना हे मान्य आहे का. ही युती बाळासाहेबांनी केली आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युती कटिबद्ध आहे. मोदी, शहा यांचे नेतृत्वाखाली भारताला मजबूत करण्यासाठी आमची युती आहे.

Latest Posts

Don't Miss