spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची मोठी बैठक

केंद्रीय मंत्री ( BJP) अमित शहा ( Amit Shaha) येत्या ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान अमित शहा प्रामुख्याने लालबागच्या राजाचे व दादर मधील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे ‘मिशन मुंबईला’ आरंभ होणार आहे. अमित शहा हे मुंबईत असताना भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहा यांच्या उपस्थितीत हे बैठक पार पडणार आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन शुभारंभ

अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या राजाचे दर्शनाला नियमित यायचे. अमित शहा हे २०१७ मध्ये भाजपाचे अध्यक्ष झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षात देशभरात कोरोनाचे सावट असल्यामुळे अमित शहा यांना लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणं शक्य झालं नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अमित शहा मुंबईमध्ये दाखल होतास लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत.

अमित शहा यांचा मुंबई दौरा

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत दौऱ्यानिमित्त येणार आहेत. यावेळी ते प्रसिद्ध लालबागचा राजाचे शिवाय सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnvis) व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Aashish shelar) यांची उपस्थिती असणार आहे.

विशेष म्हणजे या दौऱ्या दरम्यान, येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या २५  वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेवरून शिवसेनेला पायउतार करण्यासाठी भाजपाने आता चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील भाजपाची जबाबदारी आता आशिष शेलार यांच्यावरच भाजप पक्षश्रेष्ठींनी सोपवली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने आशिष शेलार यांच्यावरील ही जबाबदारी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच त्यांनी आपली झलक दाखवली होती. आशिष शेलार म्हणाले होते , ”मुंबईवरील एका कुटुंबाची मक्तेदारी संपली पाहिजे. आमचे २०० + नगरसेवक निवडून येतील आणि आमचे ४५+ खासदार निवडून येतील.” सध्याची राजकीय परिस्थिती कोणत्या वळणावर वळण घेईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.

Latest Posts

Don't Miss