spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! अनिल देशमुख यांची आर्थर रोड जेलमध्ये प्रकृती खालावली

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (NCP leader and former Home Minister Anil Deshmukh) यांची आज प्रकृती बिघडली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (NCP leader and former Home Minister Anil Deshmukh) यांची आज प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलॆ आहे.

अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत, ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी अकरा वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे दोन ते तीन दिवस त्यांना अजून जे जे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी देखील त्यांची अशीच तब्यत बिघडली होती.

अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे आरोप आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा :-

‘पोटात एक आणि ओठात एक…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकचे खड्डे पोहचले उच्च न्यायालयात

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss